मंठा शहरातील वार्ड क्र. ११ मधील जलील कॉलोनी, अब्दुल्ला पार्क आणि एम.बी. कॉलोनी परिसरात मोकार कुत्र्यांच्या वाढत्या प्रकोपामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांमुळे भीती वाटत असून शाळेमध्ये जाण्याच्या वेळीही ते अडचणींना सामोरे जात आहेत. या गंभीर समस्येसंदर्भात नागरिकांनी नगर पंचायत मंठाला तक्रार दाखल करून मोकार कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पिंजराबंद विल्लेवाट लावण्याची विनंती केली आहे.
शहरातील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वार्ड क्र. ११ मधील जलील कॉलोनी, अब्दुल्ला पार्क आणि एम.बी. कॉलोनीमध्ये मोकार कुत्र्यांची संख्या हद पार झाली असून त्यामुळे नागरिकांना, विशेषतः बालकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील मुलांवर कुत्र्यांचा हल्ला होण्याची चिंता इतकी वाढली आहे की, मुले शाळेत जाण्यापासून घाबरत आहेत. या संदर्भात पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, “*शाळेच्या मुलांच्या मागे मोकार कुत्रे सतत येत असल्याने मुलं शाळेत जाण्यापासून घाबरत आहेत,*” म्हणून लवकरात लवकर कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विल्लेवाट लावण्याची काणी केली आहे.
या पत्राद्वारे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष, मंठा यांना वारंवार करावयाच्या कारवाईसाठी विनंती करण्यात आली असून, मोकार कुत्र्यांवर नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा तातडीने उभारावी असे नम्रपणे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी निवेदन देतांना मुक्तदिर बशीर उद्दीन बागवान व त्यांचे सहकारी