*जमात-ए-इस्लामी हिंद, नेर, जिल्हा जालना तर्फे “सीरतुन्नबी (स.अ.)” नातिया स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभाचे यशस्वी आयोजन* …………………………………………. “मुलांची इस्लामी पद्धतीने जपणूक करून त्यांना दुनियेतील आणि अखेरतच्या यशाचे साधन बनवा” (सरताज शाकिर)* ………………………………………… *जालना*:(*प्रतिनिधी*)
“स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना जहन्नमच्या आगीतून वाचवा.” अल्लाह तआलाने माणसाला सुंदर स्वरूपात निर्माण केले, त्याला जोड्यांमध्ये बनविले आणि इस्लामसारखी नेमत दिली. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना अल्लाहने जगात रहमत बनवून पाठविले, जेणेकरून माणसांना जहन्नमपासून वाचवून जन्नतुल फिरदौस मध्ये दाखल करता येईल. खरी कामगिरी म्हणजे अखेरतची कामगिरी आहे.
या विचारांची मांडणी सरताज शाकिर (नॅशनल जॉइंट सेक्रेटरी, फेडरेशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशनल असोसिएशन ऑफ इंडिया – FMEII) व डिप्टी ऐजोकेशन आफीसर औरंगाबाद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “औलादची तालीम व तरबियत” या विषयावर करताना केली. त्यांनी पुढे सांगितले की, आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते. आपल्याला दीन आणि दुनियेची दोन्ही तालीम घ्यायला हवी. मोबाईलचा वापर शिक्षणासाठी करावा. एक आदर्श समाज घडवण्यासाठी उम्मत-ए-मुस्लिमा वर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि कुरआन मजीद यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून जगासमोर आदर्श सादर करायला हवा.
ही नातिया स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ जामा मस्जिद, नेर, जिल्हा जालना येथे आयोजित करण्यात आला.
प्रारंभीचे भाषण अमान खान (शहर अध्यक्ष , जमात-ए-इस्लामी हिंद, नेर) यांनी केले. त्यांनी सांगितले की, जमात एका बाजूला दावत आणि तबलीगचे कार्य करते, तर दुसऱ्या बाजूला उम्मत-ए-मुस्लिमच्या तालीम व तरबियतीचे कर्तव्यही पार पाडते. हा कार्यक्रमही त्याच कार्याचा एक भाग आहे. आजच्या परिस्थितीत उम्मतने आपल्या आचरणातून आणि बोलण्यातून इस्लाम, कुरआन व सीरत लोकांपर्यंत पोचवावी आणि मस्जिदशी आपला संबंध मजबूत करावा.
यानंतर मौलाना मुजफ्फर सिद्दीकी (इमाम व खतीब, जामा मस्जिद नेर) यांनी “मोहब्बत-ए-रसूल आणि त्याचे तक़ाजे” या विषयावर विचार मांडताना सांगितले की, अल्लाह तआला स्वतः नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर प्रेम करतो, म्हणून उम्मतनेही त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायला हवे. सहाबा-ए-कराम र.अ. यांना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आपल्या जीवापेक्षा अधिक प्रेम होते. आजच्या काळात आपल्यालाही आपल्या जीवनात सीरत-ए-नबी (स) चा स्वीकार करण्याची नितांत गरज आहे.
स्पर्धेचे तपशील :
नातिया स्पर्धेत १८ विद्यार्थिनी आणि १ विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
क्विझ स्पर्धा विजेते :
प्रथम : ईरम फखरुद्दीन – ₹2000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी
द्वितीय : सानिया फारूक – ₹2000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी
तृतीय : अलवीरा ख्वाजा खान – ₹1000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी
नातिया स्पर्धा विजेते :
प्रथम : लाइबा अल्ताफ शेख – ₹1000 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी
द्वितीय : आयशा साजिद खान – ₹700 रोख, प्रमाणपत्र, ट्रॉफी