“मुलांच्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर अधिक खर्च करा, शेख सूभान अली
,*वसमत येथे ‘एज्यु फेस्ट 2’ चे यशस्वी आयोजन

(प्रतिनिधी वसमत).वसमत शहरातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत रुची निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रहबर एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, वसमत यांच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.*
.या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, किरात, पोस्टर प्रदर्शन, विज्ञान क्विझ आणि विज्ञान प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी वसमत येथील सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता झाले, तर दुपारी २.०० वाजता बक्षीस वितरण व मार्गदर्शन समारंभ संपन्न झाला.

.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना इम्तियाज बरकाती साहेब (इमाम, मंगळवारा मशिद) होते. त्यांनी इस्लाममध्ये शिक्षणाचे अत्यंत महत्त्व अधोरेखित केले. इस्लाम हा ज्ञानाचा धर्म असून, पहिली आयतच “इक्रा” (वाचा) या आज्ञेने सुरू होते, ज्यामुळे शिक्षणाला फर्ज ठरवले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले आहे की, “शिक्षण प्राप्त करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष आणि स्त्रीसाठी फर्ज आहे.” मौलाना साहेबांनी पुढे म्हटले की, शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर मानव कल्याणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. ज्ञानामुळे माणूस अल्लाहच्या मार्गावर चालतो, अज्ञानता हा सर्वात मोठा अभिशाप आहे.अशा प्रकारे शिक्षणाने व्यक्ती आणि समाज दोघांचेही कल्याण साधले जाते, असा त्यांचा मार्गदर्शक संदेश होता.
![]()
.प्रमुख पाहुणे म्हणून वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजुभैय्या नवघरे साहेब उपस्थित होते. त्यांनी रहबर एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. इंजिनिअर आमेरअली पठाण हे विद्यार्थ्यांसाठी अशा शैक्षणिक, बौद्धिक आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवून अतिशय महत्त्वाचे व दिशादर्शक कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो, असे ते म्हणाले. शासन आणि समाजाने अशा उपक्रमांना नेहमी पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.*
कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना इंजिनिअर आमेर अली (सचिव, रहबर एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तसेच डायरेक्टर, एरूडाएट अकॅडमी) यांनी एज्यु फेस्ट विषयी सविस्तर माहिती दिली आणि या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास इसहाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, जवळा बाजारचे अध्यक्ष मा. मुनीर पटेल साहेब, वसमत नगर परिषद अध्यक्षा मा. सुनिता मनमोहन बाहेती मॅडम, ए.पी.आय. खंडारे साहेब, उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली, एम.पी.जे. जिल्हाध्यक्ष सय्यद मेहमूद अली साहेब, खारी अकिल खास्मी साहेब, तसेच नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशातील नामवंत वक्ते शेख सुभान अली साहेब (अध्यक्ष – मराठी मुस्लिम समाज तसेच अध्यक्ष – अज्ञाकरी परिवार) यांनी विशेष उपस्थिती लावून पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. “मुलांच्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर अधिक खर्च करा,” असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमात मोहम्मद इस्माईल मोहम्मद इब्राहिम (सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक) यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी भोसले साहेब (गट शिक्षण अधिकारी), शंकरराव कदम साहेब (अध्यक्ष, संत नामदेव महाराज प्रशासकीय महाविद्यालय, वसमत)
![]()