जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि परतूर- मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे नुकसान झाल्या असल्यामुळे त्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला आज घडीला शेतकरी उध्वस्त झालेला आहे आणि हवालदील झालेल्या शेतकऱ्याला पिक विमा ची भरपाई मिळत नाही.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य शासनाने पंचनामा न करता सरसकट केली पाहिजे व सरसकट कर्जमाफी सुद्धा केली पाहिजे असे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आश्र्वासित करण्यात आले.
शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यास युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर मोठ्या संख्येने आंदोलन उभारण्याचा इशारा सरकार ला देण्यात आला. या संदर्भात परतूर – मंठा विधानसभा अध्यक्ष अँड विलास राठोड यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.
यावेळी माझ्या सोभत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चैतन्य जायभाये, प्रदेश सचिव सुरेश वाहुळे, प्रदेश सचिव जफर खान, जालना युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देवराज डोंगरे, परतुर विधानसभा उपाध्यक्ष वसीम जमीनदार, सचिन कचरे -जिल्हा महासचिव बाजीराव खरात, प्रांतिक प्रतिनिधि संतोष दिंडे, जुलकर वरफळकर ,रविराज आढे , शेतकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.