उम्मत मुस्लिम ही दाई उम्मत आहे म्हणून संपूर्ण उम्मतने आपल्या बोलण्यातून व आचरणातून बांधवांपुढे इस्लामचा सार्वत्रिक संदेश पोहोचवणे आवश्यक आहे

उम्मत मुस्लिम ही दाई उम्मत आहे म्हणून संपूर्ण उम्मतने आपल्या बोलण्यातून व आचरणातून बांधवांपुढे इस्लामचा सार्वत्रिक संदेश पोहोचवणे आवश्यक आहे
(सिमाब खान – अध्यक्ष SIO)
…………………………………………. जालना तर्फे दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी राज्यव्यापी मोहिम “नबी ﷺ ची उम्मत – दाई उम्मत” या शीर्षकाखाली भव्य परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
………………………………………….
जालना (सैयद शाकीर यांच्या मार्फत)
परिषदेची सुरुवात जालना येथील प्राचीन बागबान मशीदीत अब्दुल्लाह यांनी सूरह सफ याचे पठण व भाषांतर करून केली.
प्रारंभीचे शब्द सैयद तौहीद यांनी सादर केले. त्यांनी जालना युनिटच्या उपक्रमांचा उल्लेख करताना कॉर्नर मीटिंग, कॉलेज, शाळांमध्ये व्याख्यान यांचा उल्लेख केला आणि ही मोहीम जालन्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा व विशेषतः उम्मत मुस्लिमाला जागृत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
यानंतर “फर्जे मन्सबीची पुकार” या विषयाखाली सिमाब खान (अध्यक्ष – SIO साऊथ महाराष्ट्र) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की उम्मतचे संरक्षण हे केवळ दावत-ए-दीन सादर करण्यामध्ये आहे. SIO चे सदस्य व सहयोगींनी प्रत्यक्ष आचरणातून इस्लामचा शांततेचा आणि सौहार्दाचा संदेश मानवतेपुढे मांडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उम्मत मुस्लिम दाई उम्मत आहे याची जाणीव उम्मतमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून उम्मत हे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम होईल. या मोहिमेअंतर्गत SIO संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय आहे.
यानंतर कार्यक्रमाचा मुख्य विषय “नबी ﷺ ची उम्मत – दाई उम्मत” या शीर्षकाखाली मौलाना अब्दुलकवी फलाही (सचिव – फॅमिली काउन्सिलिंग सेंटर, जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की दावत देणे हे उम्मत मुस्लिमावर फर्ज-ए-अईन आहे. जसे नमाज फर्ज आहे तसेच दावत-ए-दीन, तबलीग-ए-दीन देखील फर्ज-ए-अईन आहे. पण उम्मतमधील मोठा घटक या महत्त्वाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो. मुस्लिमांनी या देशात दाई उम्मतचे कर्तव्य स्वतःच्या आचरणातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
अनस नबील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, मोहम्मद परवेज यांनी आभार मानले. मौलाना अब्दुलकवी फलाही यांच्या दुआने कार्यक्रमाची सांगता झाली.
अल्लाह ताआला SIO च्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना कबूल करो आणि अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण करो. आमीन.
*SIO जालना*