जालना येथे महाविकास आघाडीचे जनसुरक्षा कायद्याविरोधात धरना आंदोलन

जालना महाविकास अघाडीचे समविचारी पक्ष व संघटनांनी जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन महात्मा गांधी स्मारक, गांधी चमन, जुना जालना येथे केले. या आंदोलनानंतर मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हा कायदा लोकशाहीला मारक आहे. लोकशाहीत विरोध होणे स्वाभाविक असून त्यातूनच लोकशाहीचा विकास होतो. त्यामुळे शासनाने लोकभावना लक्षात घेऊन हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली
या आंदोलनास महाविकास आघाड़िचे वरिष्ठ नेते, वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक संगठना, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.