Trending
जी ई एस मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

हसणाबाद येथील श्री गणपती इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती दिन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ध्वजारोहण केशवराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजन राजेश गरुड,लक्ष्मण म्हस्के,निवृत्ती जुबड,दिलीप लड्डा, संतोष इंगळे,विश्वंभर वानखेडे, भगवान वानखेडे,गजानन पारवे,सहाणे, मोरे जी ई एस स्टाफ या सर्वांच्या उपस्थितीत पार पडले.
सर्व विद्यार्थ्यांनी खणखणीत इंग्रजी भाषणे केली.
यावेळी छोटे चिमुकले विद्यार्थी उत्साहाने मुक्ति संग्रमातील विविध हुतात्मे व सुधारक यांच्या वेशात सहभागी झाली होती.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ढगाळ वातावरण यामुळे प्रांगणाला खऱ्या खूर्या संग्राम ठिकाणाचे स्वरुप प्राप्त झाले होते. अशा प्रकारे यंदाचा मराठवाडा मुक्ति संग्राम दिन पार पडला.