Hasnabad Police Bust Theft Case, 2 Nabbed with ₹8.5 Lakh Recovery

हसनाबाद पोलिसांची मोठी कारवाई; सळई चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत, ₹8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

हसनाबाद पोलिस आरोपीसह

हसनाबाद/ दि. 17 एप्रिल 2026) –

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल 2026 रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हसनाबाद येथील गुरूमाऊली ट्रेडर्स  दुकानासमोर उभ्या असलेल्या आयसर ट्रकमधील लोखंडी सळई अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार फिर्यादी सत्यनारायण राठी (रा. हसनाबाद) यांनी दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 74/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या तपासातून आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी

  1. ताबेश रफिक शेख (वय 20 वर्षे, रा. मदिना मस्जिद हडको कॉलनी घाट रोड, चाळीसगाव, जि. जळगाव)
  2. समीर रज्जाक शेख (वय 32 वर्षे, रा. बडोद बाजार, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)

या आरोपींकडून चोरीस गेलेल्या लोखंडी सळईपैकी ₹8,59,163/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, चोरीस गेलेल्या उर्वरित मालाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटकेर (भोकरदन) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सखाराम तायडे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी झाली.

👉 हसनाबाद पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Sayyed Karim Builder

Share Post

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!