Olympiad medals distributed to students in Hasnabad on Independence Day.

हसनाबाद येथील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी ओलंपियाड पदकांचे वाटप

हसनाबाद प्रतिनिधि 

हसनाबाद येथील श्री गणपती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हसनाबाद या शाळेत भारत देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथमता गावात प्रभात फेरी काढून ड्रिल मार्च, ड्रम पथकासह पथसंंचलन करण्यात आले. ध्वजावरोहण प्रकाश किसनराव रासने यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. हसनाबाद गावचा संपूर्ण परिसर वंदे मातरम! भारत माता की जय! या घोषणांनी दणाणून गेला होता.

हसनाबाद शहरात आकर्षक पथसंचलन बघून प्रथमच आशा प्रकारचे नियोजन व उपक्रम होतांना दिसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये  कुतूहल आणि विद्यार्थ्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.

त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांची आपापल्या परीने दिन विशेष  Indipendant Day विषयी भाषणे केली.
काही विद्यार्थ्यांनी शौर्य गीतांचे सुंदर सादरीकरण केले.

त्यानंतर गणित, इंग्रजी, विज्ञान व सामान्य ज्ञान इत्यादी ओलंपियाड परीक्षांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल्स व प्रमाणपत्रे,निकाल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली राऊत व रेणुका दानवे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा पवार यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा मिसाळ यांनी बक्षीस वितरण प्रसंगी प्रोत्साहन पर भाषण दिले. त्याचप्रमाणे गौरव गरुड, मालुसरे, भारती पारवे, दूर्वा जगताप, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. अशाप्रकारे कार्यक्रम समाधानकारकरीत्या पार पडला.

Sayyed Karim Builder

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!